राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयाची पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरुद्ध कारवाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयानं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विरुद्ध कडक कारवाई करत देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकून अनेकांना अटक केली आहे. काल रात्री केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडु, उत्‍तर प्रदेश, मध्‍य प्रदेश, आणि महाराष्ट्रासह एकूण दहा राज्यांमध्ये NIA नं छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतलं. विशेषतः केरळमध्ये सुमारे पन्नास ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य पुरवल्याप्रकरणी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्न असलेल्या शंभर पेक्षा अधिक संशयितांना NIA नं अटक केली आहे. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image