विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू - जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक…