रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतीकडून शोक व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांचं आज निधन झालं. स्वामीजींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींनी अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी स्वामी शिवमयानंद महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  संस्कृतीक आणि अध्यात्मिक क्षेत्रातलं शिवमयानंद स्वामींचे योगदान सदैव लक्षात राहील असं प्रधानामंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.