पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी निषेध केला आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते. ज्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे, त्या राज्यात अशी घटना अत्यंत निन्दनीय आहे, असं ठाकूर म्हणाले. माध्यमांची गळचेपी अजिबात खपवून घेतली जाऊ नये, असं मत ठाकूर यांनी व्यक्त केलं. पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंदा बोस यांनी संदेशखाली भागातली परिस्थिती सावरण्यासाठी आणि त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी राजभवनात शांतता कक्ष सुरू केला आहे. ज्या महिलांना असुरक्षित वाटत असेल, त्यांनी राजभवनात राहायला यावे, असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे.