एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे.

मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज सकाळी हे कार्गो जहाज बुडत असल्याचं समजलं होतं. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही तट रक्षक दलाच्या सुभद्रा कुमारी चौहान या जहाजासह २ हेलिकॉप्टरनी हे बचावकार्य पूर्ण करत या कर्मचाऱ्यांना रेवदंडा किनाऱ्यावर आणलं.

बंदरावर पोचताच या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.