कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शोधला उपाय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेतून प्रवास करताना कोरोना संसर्गाचा मोठाच धोका असतो. अशा संसर्गाला आळा घालण्यासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्वावर चार कोविड रोधकडबे तयार केले आहेत.

वातानुकुलीत डब्यांमध्ये प्लाझ्मा एअर उपकरण बसवण्यात आलं आहे, जेणेकरून, बाहेर पडणार्यान प्रवाशांचं निर्जान्तुकीकरण होईल, तर, सामान्य श्रेणीच्या डब्यांमध्ये अति नील निर्जन्तुकिकरण यंत्र बसवण्यात आलं आहे. तसंच प्रवासी ज्या लोखंडी बारला धरून डब्यात चढ-उतार करतात त्या बार वर तांब्याचा लेप चढवला गेला आहे.

सध्या हे चार डबे जयपूरहून सुटणाऱ्या चार वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांना जोडण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास असे आणखी डबे तयार केले जाणार आहेत.