प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.

यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचं लोकार्पण करणार आहे. हे केंद्र शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात उभारण्यात आलं आहे.

याच समारंभात मोदी ‘प्रधानमंत्री भारतीय जनौषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी चर्चादेखील करणार आहेत.

लोकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधं मिळावीत यासाठी जनौषधी परियोजना सुरु झाली असून त्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी देशभरात १ ते ७ मार्च हा आठवडा ‘जनौषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.