जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार हे जनतेची फसवणूक करणारं सरकार असल्याची टीका ठाकरे यांनी केली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती, त्यातला किती निधी मराठवाड्यासाठी देण्यात आला, हे श्वेतपत्रिका काढून सरकारने जाहीर करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.