येत्या १ जुलै पासून बचत खातेधारकांना नवं सेवा शुल्क लागू करण्याचा भारतीय स्टेट बँकेचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं एक जुलै २०२१ पासून बचत खातेधारकांसाठी, नवे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे हे नवे दर एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर लागू होणार आहेत. एटीएम मधून एका महिन्यात चार वेळा मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना, १५ रूपये आणि जीएसटी असं शुल्क द्यावं लागेल. तर चार मोफत व्यवहारानंतर सर्वच एटीएम आणि शाखेतून केलेल्या व्यवहारावर, शुल्क आकारलं जाईल, असं स्टेट बँकेकडून सांगण्यात आलं आहे.