केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिली. बंदरे, जहाज आणि लॉजिस्टिकस या विषयावरील ११ व्या द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.

पर्यावरण रक्षणाला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून प्रदूषण टाळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, असं ते पुढे म्हणाले. २६० रोप वे आणि केबल कार प्रकल्प दिल्ली आणि आसपासच्या भागात सुरू करण्यात  आले आहेत. त्यामुळे अशा उपायांनी वाहतूक कोंडीची समस्या आणि वायू प्रदूषण कमी करण्यात नक्कीच हातभार लागणार आहे.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image