शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली असून याप्रकरणी आपलं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय काहीही निर्णय देऊ नये अशी विनंती केली आहे.