राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी यांच्यासह इतर खेळाडूंना राष्ट्रपतींनी गौरवलं.मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींनी आज प्रदान केला.यावेळी राष्ट्रपतींनी द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांचंही वितरण केलं.केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर,खेळाडूंचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image