अरविंद केजरीवाल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला अनुपस्थित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.दिल्लीतल्या कथित अबकारी कर धोरण आणि मनीलॉंडरिंग प्रकरणी आज त्यांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं त्यांना समन्स बजावल होतं. केजरीवाल यांच्यावर बजावण्यात आलेलं हे तिसरं समन्स असून या आधी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये समन्स बजावल्या नंतरही ते चौकशीसाठी आले नव्हते. केजरीवाल यांच्यावर बजावण्यात आलेल्या समन्स बद्दल कायदेशीर पावलं उचलली जातीलं असं आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. 

सक्तवसुली संचालनालयानं अरविंद केजरीवाल यांना बजावलेला समन्सचं बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हवाला प्रकरणात आपचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि संजय सिंग हे या आधीचं  सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत आहेत.