वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयानं फेटाळल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि विश्वेश्वर मंदिर वादप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. सर्वेक्षण सुरु ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली असून अहवाल दाखल करायचा आदेशही दिला आहे.  वाराणसी न्यायालयात या प्रकरणी एकूण पाच याचिकांवर सुनावणी सुरु आहे.