घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेचा फेरविचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं होतं. केरळ आणि जम्मू काश्मीर मध्ये याआधीच ही मोहीम राबवली जात आहे. या राज्यांनी अवलंबलेल्या पध्दतीचा अभ्यास करून ती पद्धत देशभरात वापरता येईल का, याची पडताळणी करावी असं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांनी केंद्राला सांगितलं आहे.