नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. नवीन तरतुदींनुसार टपाल सेवा विभागाचे महासंचालक हे टपाल विभागाचे प्रमुख असतील. आणि टपालाचे दर आणि टपाल तिकिटांचा पुरवठा याबाबतचे निर्णय त्यांच्या अधीन असतील. तसंच टपाल पार्सलाच्या ने-आणीत सुरक्षेच्या कारणास्तव सरकारला  हस्तक्षेप करता येईल. देशभरात पसरलेल्या टपाल व्यवस्थेच्या जाळ्यामार्फत लोककल्याणाच्या योजना राबवण्याचा सरकारचा हेतू असल्याचं दूरसंवाद राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांनी सांगितलं. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image