इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ९ विभागीय मंडळांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक मंडळानं काल जाहीर केलं. इयत्ता बारावीच्या सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यवसाय अभासक्रमांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे, तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा २ ते २० फेब्रुवारी दरम्यान होतील. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे, तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आहे. दोन्ही परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मंडळानं पत्रकाद्वारे दिली आहे.