सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारची २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे. खरीपाचा कांदा यायला उशीर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चढे राहिले आहेत. कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं २९ ऑक्टोबरपासून कांद्याचं किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकी डॉलर्स करणं,  राखीव साठ्यामध्ये 2 लाख टन कांद्याची भर घालणं इत्यादी उपाय केले आहेत.

आता केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं एनसीसीएफ संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून २५  रुपये किलो दराने कांद्याची  विक्री सुरु केली आहे.