जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा  परिषदेंतर्गत कॉप-२८ चं हे शिखर संमेलन संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे संमेलन २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी शिखर संमेलनात सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन या शिखर संमेलनात सहभागी होणार नाहीत, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.