भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अखंड भारताचा  आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार  न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा  सरदार पटेल यांनी  पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत  विद्यापीठाचे  कुलगुरु प्रा.  हरेराम त्रिपाठी  यांनी आज व्यक्त केले.

केंद्रीय  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय  संचार कार्यालय नागपूर  आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज   त्रिपाठी यांच्या  हस्ते आज रामटेकच्या विद्यापीठ परिसरात  झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय प्रामुख्याने  उपस्थित होते.

केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य, त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीतील योगदान सर्वांपर्यंत विशेषतः शिक्षण क्षेत्रातील नव्या पिढीपर्यंत पोचावे, यासाठी या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे  आपल्या प्रास्ताविकात   केंद्रीय  संचार कार्यालय नागपूरचे क्षेत्रीय  प्रचार अधिकारी  सौरभ खेकडे यांनी सांगितल. कार्यक्रमाचे संचालन विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी  डाॅ. रेणुका बोकारे यांनी केले. 

 या छायाचित्र प्रदर्शनात सरदार पटेल यांच्या जीवनाशी संबंधित दुर्मिळ चित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात  आले असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 3 नोव्हेंबर पर्यंत निशुल्क: पाहण्यास खुले राहणार आहे.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image