अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील - परराष्ट्र मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या जग वादळी परिस्थितीमधून जात असताना अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील असं आज परराष्ट्र मंत्री  एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात भारत समस्यांना सोडवण्यास प्राधान्य देत असल्याचं देखील त्यांनी यावेळी  सांगितलं. आधुनिक उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने निर्मिती करण्यास सुरुवात केल्यास, आपण जगाला खूप काही देऊ शकतो असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.