भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर -उपराष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर आहे, असं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या  भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या 49 व्या प्रगत व्यावसायिक कार्यक्रमातल्या  सहभागींना आज ते संबोधित करत होते. भारत  क्वांटम कॉम्प्युटिंग,  6G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या  क्षेत्रातल्या  नवकल्पनांच्या आघाडीवर आहे,  लोकांनी स्वतःला आधुनिक  तंत्रज्ञानानं  सुसज्ज करून  त्याची शक्ती वापरणं  गरजेचे आहे,  भारतीय  प्रतिभा जगात अतुलनीय आहे, असं  प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. तसंच चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणाचे त्यांनी यावेळी  कौतुक केलं. संरक्षण दलातल्या  जवानांची सर्वोच्च पातळीवरील कामगिरी आणि अतुलनीय कर्तव्यभावना  याबद्दल उपराष्ट्रपतींनी  त्यांचं  कौतुक केलं.