जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. २४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या 'ॲग्रो व्हिजन' या कृषी प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. येत्या दोन वर्षात शासन स्तरावरून सुमारे ३५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. इथेनॉलवर चालणारी वाहनं बाजारात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं गडकरी म्हणाले.