सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी सचिन तेंडूलकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा एका पृथ्वी गोलावर उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार मारला, तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.