महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केला. देशाचा आर्थिक विकास, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा परिवर्तनासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याची ग्वाही जोशी यांनी या कार्यक्रमात केली. २० महत्त्वाच्या खाणींचा लिलाव या टप्प्यात पार पडणार आहे. या खाणींचं अंदाजित मूल्य सुमारे ४५ हजार कोटी रुपये असल्याची आणि या लिलावातून मिळालेली रक्कम राज्य सरकारांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ग्रॅफाइट, लिथियम, मॉलिबडनम, निकेल, तांबं आणि पोटॅश या मूलद्रव्यांचा स्रोत असलेल्या या खाणी ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये आहेत.