अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

 
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप आज लोणावळ्यात आयएनएस शिवाजी या नौदल तळावर झाला. यावर्षी छात्रसेनेच्या १७ संचालनालयातल्या तरुण छात्रसैनिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वर्षीच्या स्पर्धांमध्ये छात्रसैनिकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हान देणार्‍या अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता.