राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत असेल असं शासनानं म्हटलं आहे. शासनाचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.