देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण

 



मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार १४८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही २६५ अंकांची घसरण नोंदवून १८ हजार ८५७ अंकांवर स्थिरावला. इस्राइल-हमासमध्ये वाढलेला तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किंमती यामुळं गेल्या आठवडाभरात सेन्सेक्समध्ये ३ हजाराहून अधिक अंकांची घसरण झाली आहे.