मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत १९ हजार २८२ अंकांवर बंद झाला.दोन्ही निर्देशांकांमधली घसरण, सव्वा टक्क्यापेक्षा जास्त आहे. पश्चिम आशियातल्या वाढत चाललेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं ही घसरण झाल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.