प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 


मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “ह.भ.प. बाबा महाराजांच्या निधनाने अतीव वेदना झाल्या. महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्मासाठी अर्पण केले. वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा बाबा महाराज सातारकरांनी यथायोग्य जपली. कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा त्यांनी घेतलेला वसा मागील अनेक दशके सुरु होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारकडून सन २०२०-२१ च्या ज्ञानोबा – तुकोबा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने समाजप्रबोधनातील एक ओजस्वी आवाज हरवला आहे”.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image