एक देश एक निवडणूक समितीची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत

 




मुंबई (वृत्तसंस्था) : कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात सांगितलं. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद मैदानावर झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील काल मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. मराठी माणसाला, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार नको, सगळयांना बरोबर घेऊन जाणारं सरकार असायला हवं, असं ते यावेळी म्हणाले. ठाकरे यांनी आरक्षण, मराठा आंदोलकांवर लाठीमार तसंच पक्षफुटीच्या मुद्यावरून भाजपवर टीका केली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image