जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानांमंत्र्यांसह अनेकांच्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे श्रीकृष्णांकडून विविध गोष्टी शिकण्याचीही संधी आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अन्यायाविरुद्ध लढणं आणि धर्म आणि न्याय यांच्या पथावर चालण्याचा आदर्श श्रीकृष्णांनी घालून दिला असं त्यांनी म्हटलं आहे. या सणाच्या निमित्तानं आपल्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि चैतन्य सळसळावं अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.