देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा  धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी शासनाच्या संबंधित पोर्टल वर नोंद करावी असं सरकारनं सुचवलं आहे. या साठ्याबाबतची आकडेवारी लपवून ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ग्राहक व्यवहार, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय कडक कारवाई करणार आहे. 

साप्ताहिक बाजारभाव आढावा सभेनंतर ग्राहक व्यवहार विभागाला मसूर च्या अतिरिक्त साठ्याची आकडेवारी उपलब्ध करून देण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत.  ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबत माहिती दिली. उपलब्ध असलेला मसूरचा साठा किमान विक्री दरानं खरेदी करणं हा त्यामागचा उद्देश असल्याचं रोहित कुमार म्हणाले. जेव्हा कॅनडा मधून मसूर आणि दक्षिण आफ्रिकेतून तुरीच्या  आयातीच प्रमाण वाढतं, तेव्हा या धान्यांचा काळाबाजार करणारे व्यापारी बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांची लयलूट करत असल्याचं आढळून आलं असल्यानं आता सरकारनं सावधपणे पावलं उचलली आहेत.