पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयवर अनेक नवे पर्याय उपलब्ध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर परस्पर व्यवहारांसह अनेक पेमेंट पर्याय सुरू केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये ही घोषणा केली. पेमेंट वैशिष्ट्यांचा उद्देश सर्वसमावेशक, लवचिक आणि टिकाऊ डिजिटल पेमेंट इकोसिस्टम तयार करणे आहे. यामुळे UPI ला दरमहा एक अब्ज व्यवहारांचं लक्ष्य गाठण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने माहिती दिली की त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेचे मॉडेल संयुक्तपणे विकसित करण्यासाठी IIT मद्रास इथं AI-4-India सोबत भागीदारी केली आहे.