विक्रम लँडरचा हॉप एक्सपेरिमेंट यशस्वी, लँडर आता निद्रावस्थेत गेल्याची इस्रोची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रम लँडरने काल छोटीशी उडी घेतली आणि ते पुन्हा यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. याला हॉप एक्स्परिमेंट असं म्हणतात. या अभियानातील महत्वपूर्ण कामांची पूर्तता झाल्यामुळे विक्रम लँडर भारतीय प्रमाण वेळेनुसार काल रात्री 8 वाजता निद्रावस्थेत गेलं आहे.

हॉप एक्स्परिमेंट करण्यापूर्वी विक्रम लँडरने स्वतःला 40 सेंटीमीटर वर उचललं आणि 30 ते 40 सेंटीमीटरच्या अंतरावर अलगदपणे उतरलं. या यशस्वी हॉप परीक्षणानंतर, चंद्राचा दक्षिण ध्रुव पुन्हा सूर्याच्या कक्षेत  येईपर्यंत विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर तसंच त्यावरील पेलोड्स, स्वीच ऑफ अवस्थेत असतील असं इस्रो ने समाज माध्यमांवरील संदेशांत म्हंटलं आहे.