भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत सुरू तीन दिवसीय शिखर परिषदेत बोलत होते.  देश सध्या डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संक्रमण, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक मूल्य आणि पुरवठा साखळी संक्रमण या तीन संक्रमणांमधून मार्गक्रमण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या परिषदेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर, जी २० इंडिया शेर्पा अमिताभ कांत यांच्यासह विविध देशांचे व्यापार मंत्री आणि अनेक व्यापारी नेते सहभागी होतील.