केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या पुण्यात केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. ओटीपी आधारित वापरकर्ता नोंदणी, बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा आणि नियमांचं अनुपालन करण्यासाठी प्रमाणीकरण तपासणी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे आणि इलेक्ट्रॉनिक संपर्कव्यवस्था या सुविधा  पोर्टलवर उपलब्ध असतील.

देशात १ हजार ५५० हून अधिक नोंदणीकृत बहुराज्यीय सहकारी संस्था आहेत. केंद्र सरकारच्या सहकार निबंधक कार्यालयाचं संगणकीकरण करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे. यात कागदविरहित कामकाज, देशातल्या बहुराज्यीय सहकारी संस्थांमध्ये स्वयंचलित कार्यपद्धती, डिजिटल दूरसंपर्क आणि पारदर्शक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न आहे.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image