झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी तारीख देण्याची विनंती केली होती. 

मुख्यमंत्री सोरेन यांच्या चौकशीदरम्यान अतिरिक्त फौजफाटा उपलब्ध करून देण्याची विनंती संचालनालयानं केंद्रीय सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांना केली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन आणि निलंबित I.A.S. यांच्यासह अनेक व्यावसायिक, अधिकाऱ्याना  अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.