देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट - मंत्री अर्जुन मुंडा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज राजधानी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. गेल्या आर्थिक वर्षात ४८ रेल्वे अपघात झाले. ही संख्या २०१४-१५ या कालावधीत १३५ इतकी असल्याचं ते म्हणाले. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा राष्ट्रीय रेल संरक्षण कोष निर्माण करण्यात आला असून गेल्या ९ वर्षात रेल्वेनं ४ लाख ८८ हजारांहून जास्त लोकांना रोजगार दिल्याचंही अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.