मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीन धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा अंतरिम आदेश मंजूर केला. गुवाहाटी उच्च न्यायालयानं मणिपूरमध्ये वापरात असलेल्या भाषांचे ज्ञान असलेल्या न्यायाधीशांची या चौकशीसाठी नियुक्ती करावी, असंही खंडपीठानं म्हटलं आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १ सप्टेंबरला होणार आहे.

आरोपींना न्यायालयात हजर करणं, त्यांचा ताबा घेणं, न्यायलयीन कोठडी, कोठडीत वाढ आणि इतर सुनावणी ऑनलाइन पद्धतीनं करायलाही न्यायालयानं मंजुरी दिली. यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मणिपूर सरकारला दिले आहेत.