सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो - हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत, यश मिळवलेल्या खेळाडूंचा, पिल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पालकांनी मुलांना खेळाविषयी प्रोत्साहन द्यावं तर मुलांनी खेळासोबतच शिक्षणाला महत्त्व देण्याचं आवाहन धनराज पिल्ले यांनी यावेळी केलं. विविध क्रीडा संघटकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.