दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आज मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम भारतीय विमा नियामक, विकास प्राधिकरण आणि नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज यांच्या सहयोगानं आयोजित केलं जात आहे. या परिषदेमध्ये अपंग व्यक्तींना विमा पुरवठादारांशी संपर्क साधताना त्याबरोबरच विमा कंपन्यांना पॉलिसी आणि पॉलिसी प्रदान करताना येणारी आव्हानं या विविध बाबींवर चर्चा केली जाईल. ही परिषद एकूण दोन सत्रांमध्ये होणार आहे.  या परिषदेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये अध्यक्ष असणार आहेत.