ई-श्रम पोर्टलवर रेशन कार्ड न मिळालेल्यांना २० जुलैपर्यंत रेशन कार्ड देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या असंघटित क्षेत्रातल्या सुमारे २९ कोटी कामगारांनी ३१ जुलैपर्यंत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली होती. केंद्रीय श्रण आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या कामगारांची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या डेटासोबत पडताळण्यात आली. २२ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार सुमारे २० कोटींहून अधिक कामगारांनी माहिती दोन्ही डेटाबेसमध्ये आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र रेशन कार्ड न मिळालेल्यांना २० जुलैपर्यंत रेशन कार्ड देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.