भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, जवळपास एक लाख 60 हजार टपाल कार्यालयांचं विस्तृत जाळं जगातलं सर्वात मोठं पोस्टल नेटवर्क आहे. आर्थिक समावेशनात टपाल‌विभागाची भूमिका गौरवास्पद आहे. त्यांनी आर्थिक परिस्थिती  आणि उपेक्षित  समुदायांना सक्षम बनविण्यासाठी धोरणात्मक पुढाकार घेऊन दोन्ही मधील अंतर कमी केल्याबद्दल टपाल विभागाचं कौतुक केलं. सरकारी अनुदानं, कल्याणकारी देयकं आणि निवृत्तीवेतन वितरित करण्यात टपाल विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं त्यांनी सांगितलं.