समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी मोठ्या वाहनांच्या चालकांची चाचणी होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न  पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला होता. या रस्त्यावर रोज सतरा ते अठरा हजार वाहनांची वाहतूक होत आहे, भविष्यात ही संख्या पन्नास हजार इतकी होणार आहे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व वाहनांना यापुढे १२० प्रती तास इतकी वेग मर्यादा घालण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केलं. छोट्या वाहनांनाही श्वास विश्लेषक चाचणी करण्याबाबत विचार करण्यात येईल.