महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग - जी 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाच्या बैठकीत प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जी - 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाची मंत्रिस्तरीय बैठक कालपासून गुजरातमधये गांधीनगर इथं सुरु झाली. त्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान बोलत होते. सहकार क्षेत्रात विशेषतः दुग्धव्यवसायात महिलांनी बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. महिलांच्या विकासाकरता सरकार वचनबद्ध असून, मुद्रा योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं "India @ 75: Contribution of Women’ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image