भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपड़ा यांनी सांगितलं की व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून त्यामुळे तांदळाच्या किरकोळ दरवाढीला चाप बसेल. सध्या महामंडळाकडे तांदूळ पुरेसा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरु होईल.