राज्यातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य विधानपरिषदेवर राज्यपालांनी नेमण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक यादी पाठवली होती. त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कारवाई केली नव्हती. सरकार बदलल्यावर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली.  यासंदर्भात दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्याने याचिका करायला सांगितलं आहे.