अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे मंजूर झाला. चीन आणि भारतादरम्यानची मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमारेषा असल्याचंही या ठरावात मांडलं आहे. चीन ने अरुणाचल प्रदेशच्या काही भूभागावर सांगितलेला दावा सिनेटने फेटाळला आहे. आता हा ठराव अमेरिकी संसदेत मतदानासाठी मांडला जाईल. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनची दंडेली वाढत असताना अमेरिकेने भारताच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं सिनेटर हॅगर्टी यांनी सांगितलं.