आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसगाड्या सोडल्या होत्या. या गाड्यांच्या १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. 

७५ वर्षावरच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास, आणि महिलांसाठी तिकिट दरात ५० टक्के सवलत या राज्य शासनाच्या दोन योजनांमुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रवाशी संख्या २ लाख ४५ हजार ६७० ने वाढली, तर ७ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळालं, असं एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.